BESTमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
BEST : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना आता कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. बेस्टमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : BEST : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना आता कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. बेस्टमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची कोविड-19ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Mumbai BEST Bus Drivers test positive for COVID-19)
66 पैकी सहा जणांना मंगळवारी संध्याकाळी उशिरा डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने चालक आणि वाहक यांचा समावेश आहे. आम्ही आमच्या डेपोमध्ये आरटी-पीसीआर चाचण्या घेतल्यामुळे यापैकी 60 टक्के कोविड प्रकरणे आढळून आली. व्हायरसने संक्रमित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य उपचार दिले जातील याचीही आम्ही खात्री केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालयातील बेड तयार ठेवण्यात आले होते. बेस्टने सांगितले. ज्या कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्यांना कोविड-19 साठी यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशा कर्मचाऱ्यांची बेस्ट दररोज देखरेख करत आहे.डिसेंबरच्या सुरुवातीस आमच्याकडे शून्य प्रकरणे होती.परंतु आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.