मुंबई : मुंबईतील चेंबूर भागात एका १८ वर्षीय मुलीने इमारतीच्या ६व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरती तापसे असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. या मुलीच्या वडिलांनी तिला ओरडल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेंबूरमधील माहुल म्हाडाच्या ३५ नंबर कॉलनीतील ही घटना आहे.  ही मुलगी ब्यूटी पार्लरमध्ये काम करत होती. रात्री घरी उशिरा आल्याने वडिल या मुलीला ओरडले. त्याच रागात तिने आत्महत्या केल्याचं समजतंय. २९ जुलै ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या मुलीच्या आत्महत्येचा थरार कैद झाला आहे.


या घटनेनंतर मुलीला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. या मुलीने उचललेल्या या पाऊलाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.