तुझं मोठ्या मुलीवर जास्त प्रेम...; धाकट्या मुलीनेच जन्मदात्या आईसोबत केला भयंकर प्रकार, मुंबईतील घटना
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच आईचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे.
Mumbai Crime News: मुंबईत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीनेच जन्मदात्या आईची निर्घृणपणे हत्या केली आहे. इतकंच नव्हे तर आईच्या हत्येनंतर तरुणी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. 2 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आईचे मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम होते, या रागातून आरोपी महिलेने ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईच्या कुर्ला येथे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. कुरेशी नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तिच्याच आईची निर्घृणपणे हत्या केली. हत्येचे कारणदेखील हैराण करणारे आहे. आई आपल्यापेक्षा जास्त मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते असं आरोपी महिलेला वाटायचं. त्या आसूयेतूनच तिने आईची हत्या केली. आरोपीचे नाव रेश्मा मुजफ्फर काजी असं आहे. तर, आईचे नाव सबीरा बानो अजगर शेख असं आहे. मयत महिला तिच्या मुलासोबत मुंब्रा येथे राहते. मात्र काल रात्री ती तिच्या मुलीला भेटण्यासाठी कुर्ला येथे कुरेशी नगर येथे आली होती.
आई तिच्या घरी आल्यानंतर दोघींमध्ये कडाक्याची भांडणे झाले होती. आईचे मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम आहे, असं समज निर्माण झाला होता आणि त्यातूनच ती आईचा द्वेष करत होती. याच रागातून तिने घरातील चाकूने हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून अधिक चौकशी करत आहे. तर, आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई नाका परिसरातील हत्या प्रकरणातील संशयतांना अटक
थर्टी फर्स्टच्या रात्री उंटवाडी रोडवरील क्रांतिनगर भागात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित लक्ष्मण घारे याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने संशयित आरेपी शुभम विठ्ठलराव मिरके (२१), अरुण बाळू - वळवी (२१) आणि रिझवान रईसुद्दीन - काझी व गणेश भावसार (२१) यास मुंबई नाका पोलिसांनी १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. खुनातील मुख्य सूत्रधार गणेश भावसार हा संशयित आरोपीचा मुंबईनाका गुन्हे शोध पथक रात्री शोध घेत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम भवनाच्या इमारतीवरून उडी घेत मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तो पळत असताना पोलिसांनी त्यास पकडले. मयत लक्ष्मण हा संशयितांना सतत मारहाण करत धमकावायचा याचा मनात राग धरून त्याचा काटा काढल्याचे पोलीस तापासात समोर आला आहे. भावसार याच्यावर यापूर्वी मुंबईनाका, सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.