Mumbai Fire : मुंबईत झोपडपट्टीला मोठी आग, 25 पेक्षा जास्त घरांचा कोळसा
Mumbai Slum Fire : मुंबईच्या शाहूनगर परिसरात झोपडपट्टीला आग लागली आहे. (Mumbai Slum Fire News) या आगीत कमला नगरमधील झोपडपट्टीतील 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत.
Mumbai Slum Fire : मुंबईच्या शाहूनगर परिसरात झोपडपट्टीला आग लागली आहे. (Mumbai Slum Fire News) या आगीत कमला नगरमधील झोपडपट्टीतील 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत. (Mumbai News)पहाटे 4 वाजता आग लागली असून, आगीचं कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा दहापेक्षा जास्त गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सुदैवाने आतापर्यंत या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. (Mumbai Fire News in Marathi)
मुंबईतील धारावी शाहूनगर परिसरात असलेल्या कमला नगर येथील झोपडपट्टीमध्ये ही आग लागली. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात समस्या येत आहेत. आग अद्याप धुमसत आहे.
दरम्यान, याआधी 13 फे्ब्रुवारी मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीमध्ये आग लागली होती. (Malad Fire) या आगीत एकापाठोपाठ 15 सिलिंडर फुटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत एका 14 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेत जवळपास 50 ते 70 झोपडपट्ट्या झळून खाक झाल्या होत्या.