मुंबईत अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या करण्यात आली आहे. माटुंग्यातील 52 वर्षीय व्यावसायिकाने अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन जीवन संपवलं असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेतील उपव्यवस्थापकाने अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपवल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर पुन्हा अशीच घटना घडली आहे. उपव्यवस्थापकाचा मृतदेह नवी मुंबईतील समुद्रकिनारी वाहून गेलेला आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाची ओळख पटली असून फिलीप हितेश शाह असं नाव आहे. फिलीप शाह माटुंग्यात आपल्या कुटुंबासह वास्तव्यासत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलीप हितेश शाह (Philip Hitesh Shah) गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा कुटुंबाला संशय आहे. 


"फिलीप शाह या व्यावसायिकाने बुधवारी सकाळी अटल सेतूवरून उडी मारून आपले जीवन संपवले. मध्य मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी असलेल्या शाह आपल्या सेडान कारमधून अटल सेतूवर पोहोचले होते. एका ठिकाणी त्यांनी आपली कार पार्क केली आणि समुद्रात उडी मारली," असं वृत्त पीटीआयने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.


पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, पुलाच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांना पुलावर एक कार उभी असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर बचाव पथकाला सतर्क करण्यात आलं. फिलिप शाह यांनी ज्या ठिकाणी समुद्रात उडी मारली त्या ठिकाणी तेथील कर्मचारी धावले. शोधमोहीम राबवली असता फिलीप शाह यांचाशोध लागला. 


फिलिप शाह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशी माहितीअसे पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. कारमध्ये सापडलेल्या आधार कार्डाच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटली असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. मृत्यूपूर्वी गेल्या काही दिवसांपासून पीडित व्यक्ती मानसिक तणावाखाली होती असंही सांगण्यात आलं आहे.