Gautami Patil: लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या (Gautami Patil:) लेटलतीफ कारभाचा फटका आयोजकांना बसत आहे. लेटलतीफ गौतमीमुळे आयोजक अडचणीत येत आहेत. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं  विरारमधल्या आयोजकांना चांगलंच महागात पडलं आहे. परवानगीच्या अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी विरारच्या मांडवी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. 


आयोजकांवर गुन्हा दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार येथील खार्डी गावचे प्रभाकर पाटील सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाला रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी होती. मात्र गौतमी उशिरानं पोहचली. रात्री 11 पर्यंत कार्यक्रम सुरूच होता. त्यामुळे पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला. 


बर्थडे बॉयसह दोघांवर गुन्हा दाखल


पिंपरीमध्ये वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं चांगलंच महागात पडल होते. अमित लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आयोजकांनी गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमानंतर बर्थडे बॉयसह दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.


गौतमीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली


सबसे कातील, गौतमी पाटील असं जिच्याबाबतीत बोललं जातं त्या गौतमीच्या कार्यक्रमांनी पोलिसांची डोकेदुखी वाढलीय. सांगलीत तिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला. या गोंधळी प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागलाय. 
तासगावच्या वायफळे गावातील विठ्ठल घोडके आणि रुपाली घोडके या दाम्पत्यानं लग्नाच्या 25 व्या वाढदिवसासाठी गौतमीचा कार्यक्रम ठेवला होता...कार्यक्रमात राडा होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आणि खासगी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होता. मात्र तरीही प्रेक्षकांचा धांगडधिंगा सुरू होता. अखेर पोलिसांचा संताप अनावर झाला आणि दात ओठ घात त्यांनी या गोंधळी प्रेक्षकांना लाठ्यांचा प्रसाद दिला. यातून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. ही निश्चितच महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे असच सुरू राहिलं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला फारसा वेळ लागणार नाही.