Mira Road Crime News : मुक्या प्राण्यांवर दया करा अशी शिकवण दिली जाते. मीरारोडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका श्वानाला अत्यंत क्रूर वागणूक देण्यात आली आहे.  रस्त्यावर भुंकला म्हणून त्याला जमिनीवर आपटण्यात आले. श्वानावर अत्याचार करतानाचा सर्व प्रकार  सिसिटीव्ही कॅमेऱ्या कैद झाला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरा रोडच्या कणकीय परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका रस्त्यावरील श्वानाला तीन जणांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उपचारा दरम्यान या श्वानाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्राणी प्रेमींनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर मीरारोड पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात प्राण्यांच्या क्रूर वागणूक व छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मीरारोडच्या कनकिया परिसरात रस्त्यावर श्वान भुंकल्याच्या रागातून तीन व्यक्तींनी त्याला जमिनीवर आपटून त्याची मान दाबून ठेवल्याचे सिसिटीव्ही दृश्यांमध्ये दिसत आहे.  या झटापटीत त्याच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली होती. या घटनेची माहिती परिसरातील प्राणीप्रेमी झारा यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या श्वानाला उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सिसिटीव्ही दृश्यांच्या आधारे माहिती घेत प्राणी प्रेमी झारा मर्चंट यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. 


पिसाळलेल्या कुत्र्यानं 12 लोकांना चावा घेतला


पिसाळलेल्या कुत्र्यानं १२ लोकांना चावा घेतल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली होती. शहरातील सूर्याटोला या परिसरात एकाच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्यानं वयोवृद्ध आणि लहान मुलांवर हल्ला करत चावा घेतला. तर, गाईच्या वासराचा देखील चावा घेतला. या भागात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत निर्माण झालेय. लोक भयभीत झाले असून ते घराबाहेर पडण्यासाठीही घाबरत आहेत. तक्रार करूनही नगरपरिषद कुत्र्याला पकडत नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झालेत. या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. 


10हून जास्त मुलांचा या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला


धुळ्यातील मोहाडीमध्ये मोकाट कुत्र्यांनी दहशत आहे. या भागात 10हून जास्त मुलांचा या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला होता. वर्षावाडी, जय शंकर कॉलनी, पिंपलादेवी नगर भागात 3 ते 12 वयोगटातील लहान मुलांवर त्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वी स्थानिक नगरसेवकांनी पालिकेकडे केली होती. मात्र पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा गावक-यांचा आरोप आहे.