Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा, नक्की कारण काय?
शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊतांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला शिवीगाळ केल्याच्या आरोपात राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. (a case registered against shiv sena mp sanjay raut in vakola police station at mumbai)
व्हायरल ऑडिओ क्लिप सादर करत पीडित महिलेने पोलिसांमध्ये राऊतांविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर आता वाकोला पोलिसांनी या ऑडिओ क्लिपच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे. राऊतांवर 507 अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
संजय राऊत यांच्यावर महिलेने गंभीर आरोप केलेत. या महिलेची संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. या क्लिपमध्ये शिवीगाळ करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून संजय राऊतच आहेत, असा आरोप हा पीडित महिलेने केला आहे. त्यामुळे आता पोलीस पुढील चौकशीसाठी संजय राऊतांना बोलावू शकतात. यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.