मुंबई :  राज्य सरकारमध्ये (Maharashtra Cabinet Minister Post) मंत्रिपद देण्याचं आमिष दाखवून सत्ताधारी आमदारांकडे चक्क 100 कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुणी दाखवलं हे आमीष? कुणाकडे केली १०० कोटींची मागणी? पाहूयात हा रिपोर्ट. (a demand of 100 crores from the ruling mlas by showing the lure of giving them a ministerial post in the maharashtra government)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात नवं सरकार सत्तेवर आल्यानंतर आता सगळ्यांना वेध लागलेत ते मंत्रिमंडळ विस्ताराचे.  मंत्रिपदाची संधी मिळावी, यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे आमदार वाट पाहतायत. अशा इच्छुकांना कशी आमीषं दाखवली जातायत, याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. मंत्रिपद हवं असेल तर 100 कोटी रुपये द्या, अशी मागणी सत्ताधारी भाजप आमदारांकडे करण्यात आली.


मंत्रिपद हवंय? 100 कोटी द्या


मुंबईतील हॉटेल ओबेरॉयमध्ये 17 जुलैला आरोपी आणि आमदार राहुल कुल यांची भेट झाली. त्यावेळी मंत्रिपद हवं असेल तर 100 कोटी रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली. राहुल कुल यांनी हा सगळा प्रकार देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घातला.  त्यांच्या सूचनेनुसार, आ. राहुल कुल यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
 
पोलिसांनी ओबेरॉय हॉटेलात सापळा लावला. त्यावेळी आ. राहुल कुल यांच्यासह आ. जयकुमार गोरेही उपस्थित होते. खंडणी वसुलीसाठी आलेल्या चौघांना यावेळी रंगेहाथ अटक करण्यात आली.


आरोपी रियाझ शेख हा यातला मुख्य सूत्रधार आहे. तर योगेश कुलकर्णी, सागर सगवाई आणि जाफर उस्मानी या त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केलीय.


मंत्रिपदी वर्णी लागावी, यासाठी चार भितिंमध्ये कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार होतात. राजकीय वर्तुळात सगळ्यांनाच माहित असलेलं ओपन सिक्रेट आहे. त्याचाच लाभ उठवण्याचा प्रयत्न या भामट्यांनी केला. यानिमित्तानं थेट आमदारांनाच कसं आमीष दाखवलं जातंय आणि मंत्रीपदाच्या लोभानं कसा गंडा घातला जाऊ शकतो, ही बाब समोर आलीय.