मुंबई : नालासोपाऱ्यात मध्यरात्री दीडच्या सुमारास एक चारमजली साफल्य इमारत कोसळली. ही इमारत केवळ १० वर्ष जुनी आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच सगळे रहिवाशी तत्काळ इमारतीबाहेर पडले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर भागातल्या साफल्य इमारतीचा काही भाग मध्यरात्री कोसळला. त्या आवाजानं रहिवाशी जागे झाले. त्यांनी वेळीच संपूर्ण इमारत खाली केली. अवघ्या काही वेळातचदीडच्या सुमारास अख्खी इमारत कोसळली. 



दुर्घटनेत कोणताही जीवितहानी झाली नसली तरी अनेकांचे संसार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. याठिकाणी अग्निशमन दलाच्यावतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.