मुंबई : पेपरफुटी रोखण्याच्या निर्णयाबाबत राज्य शिक्षण मंडळ काहीसे वरमले असून, आपल्या निर्णयाबाबत फेरविचार केला आहे. नव्या निर्णयानुसार अपवादात्म स्थितीत विद्यार्थ्यांना सूट देण्यात येणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.


शिक्षण मंडळाचे सिंहावलोकन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाइलवरील पेपरफुटी रोखण्यासाठी एक मिनिटही उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने नुकताच जाहीर केला होता. यावरुन मोठा वाद झाल्यानंतर आता अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांना सूट देण्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केलंय.


अपवादात्मक कारणाशिवाय 11 नंतर प्रवेश नाही


विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर 10.30 वाजता पोहोचण्याची सूचना करण्यात आली असून, अपवादात्मक कारणाशिवाय 11 नंतर प्रवेश दिला जाणार नसल्याचे नव्यानं स्पष्ट करण्यात आलंय. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत व्हॉटस्अॅपवरून पेपर फुटल्याची बाब गेल्यावर्षी उघडकीस आली होती. याची गंभीर दखल घेताना मंडळाने एक समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार, परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. त्याचप्रमाणे परीक्षा संपेपर्यंत परीक्षा केंद्रातच बसण्याची सक्ती केली होती. या निर्णयाला अनेक विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांनी विरोध केला होता.