`४० मोकाटांना संधी द्यायची मागणी मान्य नाही`
अकरा वाजताच्या पेपरसाठी साडे दहा वाजता परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितलं जातं.
मुंबई : अकरा वाजताच्या पेपरसाठी साडे दहा वाजता परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितलं जातं. एका प्रामाणिक विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून ४० मोकाट मुलांना संधी देण्याची मागणी आम्ही मान्य करू शकत नाही, असं प्रत्युत्तर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलं आहे.
दहावी बारावी परीक्षांवेळी परीक्षा हॉलमध्ये वेळेबाबत नवे नियम शिक्षण मंडळानं लागू केले आहेत. शिक्षण मंडळाच्या या नियमांवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विनोद तावडेंवर टीका केली होती. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर देताना, आदित्य ठाकरेंना टोला लगावला.
पेपर वेळेवर सुरु व्हायला पाहिजेत आणि संपायला पाहिजेत हे मान्य. मात्र पेपरच उशिरा ठेवले किंवा वेळापत्रक बदललं तर संबंधित विद्यापीठावर काय कारवाई करायची असा सवाल युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दहावी आणि बारावी परीक्षांवेळी परीक्षा हॉलमध्ये वेळेबाबत नवे नियम शिक्षण मंडळानं नवे नियम लागू केले आहेत. त्यावर नाराजी व्यक्त करताना, आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला.