Aadhitya Thackeray: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली आहे. यावेळी मुंबईचे रस्ते चकाचक करु, खड्डेमुक्त करु असे सांगितले होते, पण शिंदे सरकार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस असल्याची टिका आदित्य ठाकरे यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल मुंबईत पाऊस पडला. मुंबईकरांनी त्याचे स्वागत केले. शिवाजी पार्क, अंधेरीसारख्या ठिकाणी पाणी तुंबलं. रस्त्यावर एकही अधिकारी दिसला नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा मला राग आला. पाऊस आला त्याचं स्वागत करतो पण मुंबई तुंबली याची तक्रार करता? हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य नाकर्तेपणाचे असल्याची टिका आदित्य ठाकरे यांनी केली. 


भाषणातील महत्वाचे मुद्दे 


रस्त्याचा घोटाळा आणि नालेसफाईवर आम्ही वेळोवेळी लक्ष वेधले आहे. 


दरवर्षी आम्ही नाल्याची पाहणी करायचो आणि त्यावर कार्यवाही करायचो. पुरमुक्त मुंबई होण्यासाठी शिंदे सरकारने काय केले? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. 


मुंबई महापालिकेत वेगवेगेळे घोटाळे शिंदे सरकारने केले आहेत. पण आपण मुंबईकरांचे १ हजार कोटी वाचवू शकलो आहोत.


दहीहंडीला खेळाचा दर्जा देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, ते अजूनही शक्य झाले नाही. 


आम्ही ५० रस्ते पूर्ण करु असे आश्वासन यांनी मे महिन्यात दिले.मुंबई पालिकेच्या प्रशासनाने इतकं छोटं टार्गेट सरकारला दिलं. पण आजपर्यंत एकही रस्ता त्यांनी पूर्ण केलेला नाही. त्यात चांगले रस्ते खोदून ठेवले आहेत. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हे सरकार काम करत असल्याची टिका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 


शिंदे सरकार आणि भाजपने नाले सफाईची पाहणी केली पण आता जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हे तयार नाहीत.