मुंबई : राज्य सरकारने पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. पण भाजपने मात्र आदित्य ठाकरेंच्या या नियुक्तीला विरोध केला आहे. आदित्य ठाकरे यांची ही नियुक्ती संयुक्तिक नसल्याचं मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पद्म पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची निवड करणे खूप घाईचे आहे. अननुभवी अशा तरुण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठीची समिती तयार करणे संयुक्तिक आहे असे मला वाटत नाही. जरी ते राजशिष्टाचार मंत्री असले तरी एका प्रकरणामध्ये कोर्टामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. अशावेळी  या सन्मानाच्या पुरस्कारासाठीच्या समितीमध्ये; अध्यक्षपदी अनेक जेष्ठ, बुजुर्ग, अनुभवी, मंडळी असताना त्यांची नियुक्ती करणे योग्य आहे', असं प्रविण दरेकर म्हणाले.


सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात आलं होतं.