Aaditya Thackeray on Dharavi Redevelopment: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महायुतीचे रिपोर्टकार्ड प्रकाशित झालंय. खरंतर याचं नाव डिपोर्ट कार्ड असायला हवं. मविआचं सरकार आल्यावर नोकऱ्या देणं हे आमचं पहिलं प्राधान्य आहे. कारण राज्यातील नोकऱ्यादेखील डिपोर्ट झाल्या आहेत. काल आचारसंहिता लागायच्या आत एक मोठा भूखंड अदानी समुहाला देण्यात आलाय. जनतेला काही ना काही देतायत. 15 लाख सांगून 1500 रुपये दिले. आता 15 रुपयांवर येतील, असा टोला त्यांनी लगावला. 


मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावी पुनर्विकास योजनेबद्दल आम्ही बोलत आलोय. धारावीत 300 एकर पुनर्विकासाच टेंडर अदानीला दिलंय. मुंबईतील तुमची आमची जमीन अदानीला फुकटात दिलीय. कुर्ला, मढ, देवनार येथील जमिन अदानींना दिलीय. मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातलीय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. 


 अदानी समुहाला जे अतिरिक्त दिलंय ते परत घेणार


अरबी समुद्राचे नावदेखील अदानी समुद्र असं करुन टाकतील. देवनार भूखंडात डम्पिंग ग्राऊंड, एनर्जी प्लांट आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. धारावीतले दीड लाख परिवार अपात्र होणार. त्यांना तुम्ही जागा देणार नाहीत. आमचं सरकार आल्यानंतर अदानी समुहाला जे अतिरिक्त दिलंय ते परत घेणार. टेंडर तुम्हाला जमत नसेल तर ते रद्द करा. महाराष्ट्र अदानी समुहाच्या घशात घालायला लागलो तर आपल्याला इथे रहायला जागा मिळणार नाही, असे ते म्हणाले. 


 तर अदानी समूह 1 लाख कोटी कमावेल


7 लाख स्केअर फूटचं बांधकाम केलं तर अदानी समूह 1 लाख कोटी कमावेल. मुंबई विकून चालणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर अदानी समुहाला अधिकच दिलेलं रद्द करणार, असे ते म्हणाले. ही देशाची प्रगती आहे की अदानी समुहाची प्रगती आहे? हे आपण पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.