मुंबई : मुंबईतल्या धारावीमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. भरपावसात आदित्य ठाकरेंचा हा रोड शो झाला. यावेळी नागरिकांनी आदित्य यांच्या या रोड शोला एकच गर्दी केली होती. आज संध्याकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आापल्या मतदारसंघातील मतदारांशी आदित्य यांनी पावसात भिजत भिजत संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची प्रचारासाठी लगबग सुरु आहे. आज राज्यात प्रचारसभांचा धडाका आहे. कालपासून परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने याचा परिणाम प्रचारावर झाला. अनेक ठिकाणी प्रचारसभा रद्द झाल्या. पण काही नेते मात्र भरपावसातही प्रचारसभा आणि रॅली करत आहेत. आज मतदानाआधी मतदारांपुढे जाण्याची ही शेवटची संधी आहे. 


शरद पवार, रोहित पवार यांच्या नंतर आता आदित्य ठाकरे यांनी देखील भरपावसात मतदारांची भेट घेतली. भाजपचे अनेक दिग्गज नेते महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. या स्टार प्रचारकांच्या सभा देखील आज होत आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.