मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवावी... अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे, असं सूचक विधान शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी पुश्तीही त्यांनी यावेळी जोडली. आदित्य यांनी ही निवडणूक लढवल्यास त्यांच्यासमोर भाजप खासदार किरीट सोमय्यांचं आव्हान असेल. हाच धागा पकडून गोऱ्हे यांनी सोमय्यांना निशाण्यावर घेतलंय.  



'विश्वास कोणावर ठेवायचा?'


पंजाब बॅंकेत गोरगरिबांनी ठेवलेल्या पैश्यावर जर डल्ला मारला जात असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा. पंतप्रधान सांगतात कॅशलेस व्हा, पण जर अशा गुन्हेगारांना संरक्षण मिळत असेल तर गंभीर बाब आहे. महिलांचे बचत गट प्रामाणिकपणे पैसे ठेवतात. त्याच बॅंकेकडून विश्वासघात होतो म्हणून केंद्र सरकारची मोठी जबाबदारी आहे, असं मतही निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलंय.