मुंबई : कोरोना व्हायरसच्या रूग्णांची माहिती देण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू ऍप लाँच केलं आहे. आरोग्य सेतू ऍपने कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या ऍपच्या मदतीने अधिकाऱ्यांना देशभरात ६५० हॉटस्पॉट आणि ३०० नव्याने उदयाला येणाऱ्या हॉटस्पॉटची माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन एप्रिल रोजी ऍप लाँच केल्यानंतर आरोग्य सेतू हे ऍप ९.६ करोड लोकांनी डाऊनलोड केलं. हे ऍप विश्वात पाच करोड युझर्सकडे सर्वात जलद पोहोचणारं मोबाईल ऍप बनलं. त्यानंतर या ऍपने १० करोड लोकांची पसंती मिळवली. 



आरोग्य सेतू ऍप हे दोन उद्देशांच्या माध्यमातून सरकारची मदत करतं. या ऍपचे दोन उद्देश म्हणजे 'कुणाची चाचणी करायची आहे?' आणि 'कुठे जास्त तपासणी करायची आहे?' एएनआयला बोलताना नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ अमिताभ कांतने सांगितलं की,'महाराष्ट्रात या ऍपच्या मदतीने १८ जिल्ह्यात ६० कोरोना हॉटस्पॉटची माहिती मिळाली. देशभरात १३ एप्रिल ते २० एप्रिलच्या दरम्यान या ऍपने उप-पोस्ट ऑफिस स्तरावर १३० हॉटस्पॉट होण्याची माहिती अगोदरच दिली.'


आरोग्य सेतू ऍपद्वारे देशभराती ६५० हून अधिक हॉटस्पॉट आणि ३०० हून अधिक इमर्जिंग हॉटस्पॉटची माहिती दिली. या ऍपने माहिती दिली नसती तर ते कोरोनाचा धोका सर्वाधिक असता.