मुंबई : पालक मुलांच्या लग्नाचा विचार करतात. वेगवेगळ्या साईटवरून आपल्या मुलासाठी योग्य जोडीदार निवडताना दिसतात. पण इथे एक मुलगी चक्क आपल्या आईसाठीच 50 वर्षांचा 'वर' शोधत आहे. याकरता तिने चक्क ट्विटरवर पोस्ट टाकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आईचा नव्याने संसार थाटण्यासाठी एलएलबी विद्यार्थि असलेल्या आस्थाने ट्विटरवर पोस्ट केली आहे. आस्था वर्मा असं या तरूणीचं नाव आहे. आस्थाने #GroomHunting असा हॅशटॅग वापरून ट्विट केलं आहे. मी माझ्या आईकरता 50 वर्षांचा वर शोधत आहे. शाकाहारी, निर्व्यसनी आणि आर्थिक परिस्थिती चांगला असणारा 50 वर्षांचा वर हवा आहे. 



आस्थाच्या या पोस्टला ट्विटरवर खूप चांगील प्रतिक्रिया मिळत आहे. अनेकांनी तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. तर काहींना ट्विटरचा खूप चांगला उपयोग केल्यामुळे तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. काहींनी तिला मेट्रिमोनियल वेबसाइटचा पर्याय देखील सुचवला. त्यावर मी सगळे पर्याय वापरून झाले; पण मला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, असं आस्था म्हणाली. 


उत्तम आयुष्य जगण्यासाठी जोडीदाराची साथ ही लागतेच. कधी कधी कुणाची ही साथ अर्धवटच सोडली जाते. त्यांनी पुन्हा एकदा लग्नाचा विचार केला तर ते योग्यच आहे. पण अशावेळी आपल्या मुलांचाच पाठिंबा मिळाला तर ते सर्वाधिक चांगल असतं. पालक जसे मुलांच्या सगळ्या निर्णयात त्यांच्यासोबत असतात अगदी तसच मुलांनी देखील पालकांसोबत कायम असावं.