मुंबई : शिवसेनेचे राज्यमंत्री आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद मिटले आहेत. नाराजी दूर झाली आहे आता चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोणतेही वाद राहिलेले नाहीत, असं शिवसेनेचे नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातोश्रीवर चंद्रकांत खैरे, अब्दुल सत्तार, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीत वाद मिटल्याचं एकनाथ शिंदे यांनी बैठकीतून बाहेर आल्यावर स्पष्ट केलं आहे.


अंतर्गत संघर्षामुळे शिवसेनेला झेडपी उपाध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं. त्या पार्श्वभूमीवर काल अब्दुल सत्तारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसंच स्थानिक नेत्यांची तक्रार केली होती. त्यानंतर आज खैरे आणि दानवे यांनाही मातोश्रीवरून बोलावण्यात आलं.



तासाभरापासून ही बैठक सुरू होती. खैरे आणि सत्तारांमधील संघर्ष मिटल्याचं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.