Abhishek Ghosalkar Murder Case Father MLA Vinod Ghosalkar Reacts: मुंबईतील दहिसरमधील उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारी महिन्यात गोळ्या झाडून करण्यात आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावरुन अभिषेक यांचे वडील तसेच माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुलाच्या हत्येनंतर विनोद घोसाळकर यांनी जवळपास दीड महिन्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिकरित्या संवाद साधला. यावेळेस घोसाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा आवर्जून उल्लेख करत खंत व्यक्त केली. 


थेट फडणवीसांचा उल्लेख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद घोसाळकर यांनी एकूण 3 मंत्र्यांच्या विधानांचा संदर्भ पत्रकार परिषदेत दिला. सर्वात आधी त्यांनी फडणवीसांच्या विधानाचा संदर्भ देत ते विधान ऐकून आपल्याला वाईट वाटल्याचं नमूद केलं. "जेव्हा अभिषेकची हत्या झाली त्यावेळी माननिय गृहमंत्र्यांकडे विरोधी पक्षाने या हत्येबद्दल तसेच महाराष्ट्रात वारंवार होणारे गोळीबार आणि त्याहून होणाऱ्या हत्येबरोबरच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याने राजीनाम्याची मागणी केली. ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते मला अतिशय दु:ख देणारं होतं. त्यांनी असं म्हटलं, 'गाडीखाली श्वान आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल का?' अशा प्रकारे ते बोलल्याची बातमी छापली आहे," असं म्हणत विनोद घोसाळकरांनी नाराजी व्यक्त केली.


शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाचाही उल्लेख


पुढे बोलताना घोसाळकर यांनी एकनाथ शिंदे गटातील नेते तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील नेते उदय सामंत यांनी केलेल्या विधानाचा उल्लेख केला. "दुसरा एक मंत्री उदय सामंत यांनी त्यासंदर्भात वक्तव्य करताना म्हटलं, 'हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे.' याची साऱ्याची माझ्याकडे कात्रणं आहेत. मी आपल्याच वृत्तपत्रात या बातम्या वाचल्यात," असं विनोद घोसाळकर म्हणाले. "तिसरा मंत्री 'एकमेकांच्या भांडणातून गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार?' असं घोसाळकर म्हणाले. घोसाळकर यांनी केलेलं तिसरं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं. "मी ज्यांनी नावं घेतली त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे हे आ. हे माझ्या कुटुंबाला ओळखतात. अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास अंतीम टप्प्यातही नसताना अशाप्रकारचं भेदभाव करणारं वक्तव्य केल्याने आम्हाला असं वाटतं की तपास यंत्रणेवर पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे," असं घोसाळकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.


नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार


फेसबुक लाइव्हनंतर गोळीबार


मॉरिस भाईने फेसबुक लाईव्हवर अभिषेक घोसाळकर यांची मुलाखत घेतल्यानंतर शेवटच्या काही क्षणांमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकावर गोळीबार केला. तब्बल 5 गोळ्या मॉरिसने झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर मॉरिस भाईने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.