Maharashra Assembly : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली. राहुल नार्वेकर यांना 164 तर मविआचे राजन साळवी (Rajan Salvi) यांना 107 मतं मिळाली. तर समाजवादी पक्ष (SP) आणि एमआयएम (AIMIM) आमदार तटस्थ राहिले. 2019 ला महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणाऱ्या समाजवादीने तटस्थ भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण याबाबत समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी (Abu Azmi) यांनी तटस्थ राहण्यामागची भूमिका स्पष्ट केली. 2019 ला आम्ही महाविकास आघाडीली पाठिंबा दिला याची खंत वाटत असल्याचं आबू आझमी यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी जाता जाता उस्मानाबाद आणि औरंगाबाद शहराचं नाव बदललं. देश किंवा महाराष्ट्रात परिवर्तन होत असेल तर नाव बदला, पण इथे तरुणांना रोजगार नाही, विकास होत असेल तर माझा आक्षेप नाही, पण तुम्हाला नाव बदलून काय संदेश द्यायचा आहे. मुस्लिमांची नावे हटवून काय संदेश देणार आहात? अशी विचारणा आबू आझमी यांनी केली.


बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एक मोठं शहरं तयार करा, आम्ही टाळ्या वाजवत स्वागत करु, मोठमोठी शहरं बनवा, आज हा देश उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे, अशी टीकाही आबू आझमी यांनी केली.


भास्कर जाधव यांचं प्रत्युत्तर
आबू आझमी यांच्या भाषणावर शिवसेनेकडून भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.