मुंबई : पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप जाधव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रुग्णालयातील महिलांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि परिचारिकांनी या वैद्यकीय अधिक्षकाच्या गैरवर्तनासंदर्भात यापूर्वी पालघरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र वैद्यकीय अधिक्षकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र वैद्यकीय अधिक्षकांवर कोणतीही  कारवाई झाली नाही. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने डॉ. जाधव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार डॉ. प्रदीप जाधव गेल्या ६ वर्षांपासून वाडा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यकरत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत रूग्णालयातील महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला. 


ऐकीकडे हाथरसमधील बलात्कार आणि हत्या हे प्रकरण ताजं असताना समाजात असे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात महिला सुरक्षित नाहीत असं वास्तव वारंवार समोर येत आहे.