खेळता खेळता दोन वर्षाच्या मुलीचा जीव गेला; मुंबईतील अंगावर काटा आणणारी घटना
खेळता खेळता दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मनोज कुळकर्णी , झी मीडिया, मुंबई : खेळता खेळता दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. मुंबईत(Mumbai) ही अंगावर काटा आणणारी घटना घडलेय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वाहन अपघातात(Accident) या मुलीचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील ट्रॉम्बे( Trombay) येथील चित्ता कॅम्प परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. 2 वर्षाची मुलगी रस्त्यावर खेळत असताना एक टेम्पो या चिमुरडीच्या अंगावरून गेला. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही लहान मुलगी तिच्या भावासोबत घराबाहेर रस्त्यावर खेळत होती.
टेम्पो समोर उभा होता. टेम्पोचालक आला आणि त्या चालकाने पुढे न पाहता टेम्पो सुरू केला. हा टेम्पो मुलीच्या अंगावरून गेला. या मुली सोबत खेळणाऱ्या मुलांनी ही बाब तिच्या पालकांना सांगितली. त्यांनी लगेच या मुलीला गोवंडीच्या शताब्दी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना शनिवार दुपारी घडली आहे. अपघातानंतर ड्रायव्हर घटनास्थळावरुन फरार झाला. सीसीटी फुटेजच्या आधारे पोलिसांनी चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.