मुंबई : कंगनाच्या ऑफिसवरच्या कारवाईवरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं की, 'कोणत्याही अनधिकृत बांधकामाला वाचवा अशी भाजपची भूमिका नाहीये. कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा हा कारभार आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ठोकशाही, सूडबुद्धीचे राजकारण महाविकासआघाडी सरकार करतंय. लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे यावर भाजपचा विश्वास आहे पण शिवसेनेने वापरलेले तिन्ही शब्द त्यांच्याच तोंडावर येऊन पडतायंत. मुंबई बॉम्बस्फोटच्या साखळीने हादरली त्या याकूब मेमनच्या घरात बीएमसी घुसली नाही. संजय राऊत यांनीच काळे लिखाण केले आहे. याकूबच्या फाशीला विरोध करणा-या माणसाला पालकमंत्री केलंय.' अशी टीका देखील शेलार यांनी केली आहे.


'कंगनानं आत्ता जे ट्विट केलेत त्याबद्दल मला माहिती नाही. अनधिकृत कामाच्या विरोधात आम्ही पाठपुरावा करत राहणार. कंगनाच्या पाक म्हणण्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण महाविकासआघाडी सरकार अहंकारी सरकार आहे.' असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.