कुलगुरू पदावरून संजय देशमुखांची हकालपट्टी
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आलीय.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु पदावरुन अखेर डॉ. संजय देशमुख यांना बडतर्फ करण्यात आलंय.
ऑनलाईन पेपर चेकिंग प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका देशमुखांवर ठेवण्यात आलाय. सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या 11 तील '14 इ'च्या तरतूदीनुसार कुलपती सी विद्यासागर राव यांनी देशमुखांची हकालपट्टी केलीय.
9 ऑगस्टपासून त्यांना कुलपतींनी सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर संजय देशमुख यांनीही पुन्हा रुजू होण्याची इच्छा ऑगस्टच्या दुसऱ्या महिन्यात पत्राद्वारे व्यक्त केली होती.
मात्र, सहा महिने उलटले तरी अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे निकाल रखडलेत. विद्यार्थ्यांच्या अनेक चांगल्या संधी हुकल्या. तर अनेक विद्यार्थी आज निकालाअभावी घरी बसून आहेत. या सगळ्या घोळानंतर संजय देशमुख यांच्यावर कारवाई होणं अपेक्षितच होते.
त्यानुसार आज त्यांची हकालपट्टी करण्यात आलीय. पण कारवाई करण्यात इतका विलंब का? झाला असाही सवाल आता विचारला जातोय.