Maharashtra Politics, मुंबई : वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriay Sule) यांच्यावर गलिच्छ भाषेत केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या अंगाशी येणार आहे. या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. 


अब्दुल सत्तार यांनी काय टीका केली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य भाषेत टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी 50 खोके यावरुन अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार यांची जीभ घसरली.  'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख केला होता.   


सर्वपक्षीय नेत्यांकडू अब्दुल सत्ताचांरा निषेध


अब्दुल सत्तार यांच्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. सर्वपक्षीय नेत्यांसब मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील जाहीर सभेत अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठवली. अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त व्यक्तव्याची राज्यपालांनी घेतली दखल 


अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त व्यक्तव्याची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दखल घेतली आहे. सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनाची दखल राज्यपालांनी घेतलीय. तसंच महिला लोकप्रतिनिधींचं निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्याचं पत्रात म्हटल आहे. या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रानंतर सत्तारांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.