देवी-देवतांच्या नावानं यंत्र-तंत्र विकणाऱ्यांवर होणार कारवाई
यंत्र-तंत्र विक्री जाहिराती प्रसारित करण्यावर बंदी
मुंबई : देवी-देवतांच्या नावानं यंत्र-तंत्र विक्री जाहिराती प्रसारित करण्यावर औरंगाबाद खंडपीठानं बंदी घातलीय. जादूटोणा कायद्यानुसार या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलाय.. प्रसारमाध्यमांत देवी-देवतांची नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिराती प्रसारित करण्यात येतात.
अशा प्रकारच्या यंत्राचे उत्पादन विक्री आणि प्रचार-प्रसार करणाऱ्यांविरोधात अघोरी कृत्य आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा तसेच या प्रकरणी कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली आहेत ? याची माहिती तीस दिवसात सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
2013 च्या जादूटोणा कायद्यानुसार अशा प्रकारच्या जाहिराती प्रसारमाध्यमांवर प्रक्षेपित करण्यास मनाई आहे. तरीसुद्धा या जाहिराती लावल्या जातात. त्यामुळे औरंगाबाद लबेक याचिका दाखल केली होती त्यावर सूनवणीत खंडपीठाणे आदेश दिले.