बिग बी अमिताभ यांचा कोरोनाविरुद्ध लढा, अत्याधुनिक व्हेंटिलेटरसह इतक्या कोटीचे साहित्य दान
कोरोनाच्या (Coronavirus) काळात बिग बी अमिताभ बच्चन (Actor Amitabh Bachchan) यांनी मदत म्हणून देणगी स्वरुपात हातभार लावत आहेत.
मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) काळात बिग बी अमिताभ बच्चन (Actor Amitabh Bachchan) यांनी मदत म्हणून देणगी स्वरुपात हातभार लावत आहेत. अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील शीव रुग्णालयाला अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर देणगी म्हणून दिले आहेत. त्याचबरोबर मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर, इन्फ्युजन पंप इत्यादी सुमारे रुपये पावणे दोन कोटी किमतीची यंत्र सामुग्रीदेखील बिग बी यांनी देणगी स्वरुपात रुग्णालयास दिली आहे.
या आधी अमिताभ बच्चन यांनी पोलंडमधून oxygen concentrators मागविले होते. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत आपला हातभार लावला आहे. मुंबई महापालिकेला व्हेंटिलेटर दान केले आहेत. लोकांना मदत करण्यासाठी जे काही करता येईल ते अमिताभ बच्चन करत आहेत. दिल्लीच्या कोविड केअर सेंटरला त्यांना याआधी दोन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तसेच याआधी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) 20 व्हेंटिलेटर दान केले आहेत. ( Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
आत्तापर्यंत सुमारे 30 रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी दिलेले देणगी स्वरुपात प्राप्त झालेले दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे संगणकीय प्रणाली आधारित अत्याधुनिक आणि अद्ययावत ‘व्हेंटिलेटर’ आहेत. या यंत्रांद्वारे ज्या रुग्णांची प्राणवायू (ऑक्सिजन) पातळी खालावलेली आहे, अथवा ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी या ‘व्हेंटिलेटर’चा उपयोग केला जात आहे.
या अत्याधुनिक व्हेंटिलेटरचे वैशिष्ट्ये म्हणजे याद्वारे गरजू रुग्णांना 100 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर प्राणवायू दाब आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची सुविधा या व्हेंटिलेटरमध्ये असून नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा देखील यात आहे. तसेच ‘नॉन इन्व्हेझिव्ह मास्क’ पद्धतीने ऑक्सिजन देण्याची सुविधा या व्हेंटिलेटरमध्ये आहे, अशीही माहिती डॉ. जोशी यांनी या निमित्ताने दिली आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यावतीने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत. हे दोन्ही व्हेंटिलेटर हे शीव रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात काही दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही अत्याधुनिक व्हेंटिलेटरद्वारे गेल्या काही दिवसात सुमारे 30 गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती शीव रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.