Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आज वर्तकनगर पोलिसांनी अटक केलीये. मॉलमध्ये मारहाण केल्याप्प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आलीये. या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान आव्हाडांच्या या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेनेही उडी घेतलीये. तिने वर्तकनगर पोलीस स्टेशन एक नोटीस पाठवलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केतकी चितळेने तिच्या वकिलांमार्फत वर्तकनगर पोलिसांकडे एक नोटीस पाठवलीये. यामध्ये केतकीने जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर पोलिसांकडे मागण्या केल्या आहेत. त्यांच्यावर लावलेली कलमं पुरेशी नसून त्यामध्ये वाढ करण्यात यावी, अशी केतकीची मागणी आहे.


यासंदर्भात केतकी म्हणते, "ठाणे चित्रपटगृहात जे घडलं ते प्री-प्लॅन्ड वाटत होतं. निषेध व्यक्त करणारी व्यक्ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करते. मात्र थिएटरमध्ये जाऊन मारहाण करणं योग्य आहे का? हा सवाल मला करायचाय." 


केतकी पुढे म्हणाली, या प्रकरणात एका व्यक्तीला मारहाण केल्याचा मुद्दा आहेच, पण त्या तरुणाच्या पत्नीचा विनयभंग केल्याचं व्हिडीयोमध्ये दिसतंय. त्यामुळे आव्हाड यांच्यावर कलम 354 लावण्यात यावं. आणि हे सर्व आव्हाडांनी प्लॅन करू केलं होतं. त्यामुळं कलम 120 बी देखील लावावं. या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून आव्हाड यांना जास्तीत जास्त दिवसांची कोठडी देणं त्याचप्रमाणे जामिनाला विरोध करणं आवश्यक आहे. "