दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन आमदारकीची ऑफर दिली . तसेच ही ऑफर उर्मिला मातोंडकरने स्वीकारली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या प्रस्तावाला उर्मिला मातोंडकरने होकार दिला असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला शिवसेना आमदारकीची ऑफर करणार असल्याची याआधी चर्चा होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्मिला मातोंडकरने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगना राणौतला जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली होती. कंगनाचा सामना करण्यासाठी उर्मिलाला शिवसेनेने विधान परिषदसाठी आमदारकीची ऑफर दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.


उर्मिला मातोंडकरने मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मातोंडकर यांना भाजपच्या गोपाल शेट्टी यांनी हरवलं होतं. मात्र सहा महिन्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी ६ महिन्यानंतर काँग्रेसमधून अंतर्गत गटबाजीच्या कारणावरुन राजीनामा दिला होता. 


या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक लढवताना सोशल मीडियावरील ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिल्याने उर्मिला मातोंडकर चर्चेत आली होती आणि ही लढत आणखी रंगतदार झाली होती.


एवढंच नाही तर आर्टिकल ३७० हटवण्यावरुन उर्मिला मातोंडकरने केंद्र सरकारवरही सरळ निशाणा साधला होता. तेव्हा देखील उर्मिला मातोंडकर चर्चेत आली, कंगनाच्या तोडीस तोड उर्मिला मातोंडकरला आता शिवसेनेने आमदारकीची ऑफर दिली आहे.