आदर्श इमारत प्रकरण : अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर सुनावणी
आदर्श प्रकरणात सीबीआयला खटला चालवण्याची परवानगी देण्याच्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
मुंबई : आदर्श प्रकरणात सीबीआयला खटला चालवण्याची परवानगी देण्याच्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
आदर्श प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्याचा अर्ज सीबीआय न्यायालयाकडे करणे ही आपली चूक होती, असा कबुलीजबाब सीबीआयच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आला आहे. आपण हे सर्वोच्च न्यायालयात मान्य केले असल्याची माहिती काल सीबीआयच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.
जानेवारी २०१४ ला सीबीआयने केलेला अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास दिलेल्या परवानगीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर प्रकरणाची सुनावणी सुरु असताना सीबीआयनं आपली चूक मान्य केली आहे.
या प्रकरणात आपल्याकडे अजून काही नवीन पुरावा हाती लागला असून तो सादर करण्यासाठी आपल्याला सरकारनं परवानगी दिली आहे, असं सीबीआयनं सांगितलं आहे. पण हा पुरावा कधी सादर केला जाणार हे मात्र सीबीआयनं स्पष्ट केलं नाहीये.