वाढदिवसाचे बॅनर न लावता दुष्काळग्रस्त भागात काम करा, आदित्य ठाकरेंचं आवाहान
बॅनरबाजी न करता समाजपयोगी कार्यक्रम करण्याचा सल्ला
मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला आहे. माझ्या वाढदिवसाला बॅनरबाजी करु नका. बॅनरबाजी न करता समाजपयोगी कार्यक्रम करण्याचा सल्ला युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांचे सामाजिक भान पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर खात्यावरुन पोस्ट करुन हे आव्हान केले आहे. महाराष्ट्रात तसेचच देशभरात नेत्यांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आणि मोठ्या प्रमाणावर टीव्हीवर जाहिराती दिल्या जातात. त्यासाठी पैसे वाया न घालवता त्या पैशांचा उपयोग पर्यावरण आणि दुष्काळासाठी करावा. दरवर्षाप्रमाणे तुमचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासाठी महत्वाचे आहे असे आपल्या ट्विटच्या शेवटी म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, 'माझी नम्र विनंती आहे, कृपया माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलेही कायदेशीर/ बेकायदेशीर बॅनर लावू नये. त्यावर पैसे खर्च करण्याऐवजी, दुष्काळग्रस्त भागात सुरु असलेले आपले कार्य चालू ठेवा, पर्यावरणासाठी/ समाजासाठी काम करा. दरवर्षीप्रमाणे, मला आपले प्रेम आणि आशिर्वादच महत्वाचे आहेत.'