मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांचे राजीनामे घ्या अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. विद्यापीठातील कारभारासंदर्भात ही भेट होती. यावेळी आदित्य यांच्यासह आमदार अनिल परब, नगरसेवक अमेय घोले हे उपस्थित होते. ऑनलाइन असेसमेंटसाठी 4 दिवस कॉलेजेस बंद ठेवणं हा निर्णय दु्र्दैवी असल्याचं आदित्यने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं आता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ लागलंय. विद्यापीठानं आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आजपासून सलग चार दिवस सुटी दिली गेली आहे. प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन तपासणीतल्या घोळामुळे आता चार दिवस मुंबई विद्यापीठाच्या सर्वच कॉलेजमध्ये ही अध्ययन सुटी देण्यात आली आहे. 


३१ जुलैपुर्वी गेल्यावर्षीचे निकाल जाहीर करा असा आदेश राज्यपालांनी काढला होता. विद्यापीठात दरवर्षी १८ लाख उत्तरपत्रिका तपासल्या जातात. आता 31 जुलैच्या आत जर निकाल लावायचे असतील, तर दिवसाला 60 हजार उत्तरपत्रिका तपासून पूर्ण करव्या लागणार आहेत. त्यामुळे आता प्राध्यपकांना त्यांचं शिकवण्याचं काम सोडून तपासणीच्या कामाला जुंपण्यात आलं आहे.