युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंकडून असाही एक सवाल
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. 'मतदान जर 18व्या वर्षी करता येतं तर 18 किंवा 21व्या वर्षी निवडणूक का लढवता येत नाही?' असा सवाल उपस्थित केला आहे.
लोकसभा आणि विधानसभा
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान 25 वर्ष वय असणं गरजेचं आहे. पण याच मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले...
18 किंवा 21व्या वर्षी निवडणूक का लढवता येत नाही, पण 18 व्या वर्षी मतदान करता येतं, तर काही देशांमध्ये तर वयाच्या 18 व्या वर्षीच निवडणूक लढवता येते. राजकारणातील चांगल्या बदलासाठी आमची तरुणाई महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या गोष्टीवर विचार व्हायला हवा. यासंबंधी 2013 साली मी एका बैठकीत माझं मतंही मांडलं होतं.