मुंबई : 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी म्हणून साजरा केला जातो. मुंबईतल्या आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या नागरिकांसाठी आजचा हा दिवस खास ठरला. आदिवासी दिनानिमित्ताने आरे कॉलनीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदिवासी बांधवांनी आदित्य ठाकरे यांना नृत्यामध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरला. आदित्य ठाकरे यांनीही आग्रहला मान देत आदिवासी बांधवांच्या खांद्यावर हात टाकून फेर धरला. 


 



आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे फोटो आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केले असून आदिवासी बांधवांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ' पंचतत्त्वांशी जवळचे नाते असणाऱ्या माझ्या आदिवासी बांधव-भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आरे कॉलनी येथील पाड्यामधील नागरिकांसह हा दिवस साजरा करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद आहे. येथील रहिवाशांकडून मिळणारे प्रेम भारावून टाकणारे आहे', असे ट्वीट आदित्य यांनी केलं आहे.



या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना फळ रोपांचं वाटपही केलं.