मुंबई :  गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Pati) अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.  जयश्री यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर जयश्री पाटील यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यावरुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या शक्यतेनंतर आता जयश्री पाटील यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. (adv gunaratna sadavarte wife jayashree patil application for pre arrest bail in sessions court)


नक्की प्रकरण काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी जयश्री पाटील या फरार आरोपी आहेत. या हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


या गुन्ह्यामध्ये जयश्री पाटील यांना आरोपी घोषित करण्यात आलं आहे. मात्र जयश्री पाटील या गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. त्या राहत्या घरीही नाहीत. तसेच त्यांचा पत्ताही नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला केव्हाही अटक होऊ शकत, या भितीने जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 


या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय जयश्री पाटील यांना दिलासा मिळणार की आणखी काय होणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.