मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे परमबीर सिंग (param bir singh) यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द केल्या होत्या असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे यांनी केला आहे. पोलीस बदल्यांबाबत सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर जबाब नोंदवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परमबीर सिंग यांनी आपल्या जबाबात मुख्यमंत्री उदधव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं नवा घेतलं होतं. आता कुंटे यांच्या जबाबामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे. काही अधिकाऱ्यांनी चार्ज घेतला होता, पण या बदल्या रद्द केल्या गेल्या यावर ईडीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीताराम कुंटे यांनी जबाबात सांगितलं की,  मुख्यमंत्री यांचा फोन आला होता या बदल्यांबाबत तक्रारी आल्या आहेत आणि ह्या बदल्या न करता पूर्वस्थिती ठेवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तसंच बाबत पोलीस आयुक्तांना ही सांगा असंही त्यांनी सांगण्यात आलं. यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आयुक्तांना कळवण्यात आलं. 


बदल्या बाबत कोणाच्या तक्रारी होत्या आणि का तक्रार होती याची कल्पना आपल्याला नसल्याचं सीताराम कुंटे यांनी ईडीला सांगितलं.  कुंटे मुख्य सचिव असताना बदल्यां संदर्भात एकूण 28 मिटिंग झाल्या त्यातील 27 वेळा बदल्या झाल्या एका लिस्टला संमती मिळाली नाही म्हणून झाली नाही तसंच प्रत्येक बैठकीत देशमुख असायचं असंही कुंटे यांनी जवाबात म्हटलं आहे.  


अनेक वेळा गृहमंत्री अनिल देशमुख हे अनऑफिशली लिस्ट देत असल्याचे त्यांनी सांगितले आणि फायनल लिस्टमध्ये त्यातील बहुतेक नावे असायची असे ही त्यांनी ईडी जवाबात म्हंटलं आहे , मात्र ती लिस्ट कोण देत होते आणि त्यामागील हेतू काय याबाबत अनिल देशमुख अधिक माहिती देतील असे ही त्यांनी ईडी च्या जवाबात म्हंटले आहे


दुसरीकडे रश्मी शुक्लांच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना पत्र पाठवलं होतं. मात्र जयस्वाल यांनी त्याला कोणतंही उत्तर दिलं नाही, असा दावाही कुंटेंनी आपल्या जबाबात केलाय. 2020मध्ये शुक्ला यांनी संशयावरून काही अधिकाऱ्यांचे कॉल इंटरसेप्ट केले होते. त्या आधारे त्यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला होता, असं कुंटे यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.