मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढच्या 15 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर न करता पार्शल लॉक डाऊन जाहीर केलाय. यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. छोट्या व्यापाऱ्यासाठी सरकार काहीं ना काही पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती, पण सरकारे निराशा केल्याचे ललित गांधी म्हणाले. 


ठराविक व्यापार सुरू आणि ठराविक व्यापार बंद यामुळे मूळ उद्देश सफल होईल का याबद्दल आमच्या मनात शंका असल्याचेही ते म्हणाले. 



सरकारने व्यापाऱ्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. पुन्हा एकदा व्यापाऱ्याचा विचार करून सरकारने त्यांना दिलासा द्यावा अशी विनंती व्यापारी संघटनांनी केलीय. 


रुग्णसंख्या वाढली 


आज राज्यात 60,212 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज 281 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मतृयदूर 1.66% एवढा आहे. रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्यापासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. उद्यापासून 15 दिवस राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मुंबईसाठी आजही दिलासादायक बाब समोर आली आहे. आजही नव्या रूग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त आहे.