मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात मोठी बातमी आली आहे. मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास करणाऱ्या एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांना हाय प्रोफाईल आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणातून हटवण्यात आलंय. दरम्यान या निर्णयानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनआयशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, मला तपासातून वगळण्यात आलेलं नाहीये. या ड्रग्ज प्रकरणाचा तपास कोणत्या तरी सेंट्रल एजन्सीमार्फत व्हावा, अशी मी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे." 


हा निर्णय म्हणजे दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीममध्ये असलेला एक समन्वय आहे, असंही समीर वानखेडे यांनी सांगितलंय.


आर्यन खानप्रकरणासहित सहा प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार समीर वानखेडे यांच्या कडून काढण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. संजय सिंह हे या तपासकामाचे प्रमुख असतील. या प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणांचा तपास आता संजय सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. हा प्रशासकीय निर्णय असल्याचं NCB चे पश्चिम विभागीय उप महासंचालक मुथा अशोक जैन यांनी स्पष्ट केलंय.


मुंबई ड्रग्स प्रकरण


2 ऑक्टोबरला मुंबईतील एका क्रुझवर छापा टाकत एनसीबीने 8 जणांना अटक केली होती. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही अटक करण्यात आली होती. यानंतर 27 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खानला तुरुंगात राहवं लागलं होतं. 27 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजुर करण्यात आला.


नवाब मलिक यांचे सातत्याने आरोप


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरु केली होती. मुंबई क्रुझवरील कारवाई बनाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्रावरुन, पहिल्या लग्नावरुन इतकंच काय तर समीर वानखेडे यांच्य महागड्या शर्ट-पँटवरुनही नवाब मलिक यांनी सातत्याने आरोप सुरु ठेवले होते. तसंच या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यानेही समीर वानखेडे यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप केला होता. यानतंर एनसीबीने हे पाऊल उचललं आहे.