मुंबई : अबिर नामक एका सहा वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलांसोबत एक करार केला आहे. अबीरचे दैनंदिन वेळापत्रक आणि ते पूर्ण केल्यास त्यासाठी मिळणारा बोनस याचा हा करार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Batla_G या Twitter होल्डरने एक फोटो शेअर केला आहे. यात एक हस्तलिखित करार दिसत आहे. या करारात अबीर नावाच्या या गोंडस मुलानं दैनंदिन अर्थात सकाळी उठण्यापासून ते त्याच्या खेळण्याच्या वेळेपर्यंत, साफसफाई ते अगदी त्याचे दूध पिणे, गृहपाठ यासाठीचीही वेळ निश्चित केलीय. 


हा करार अबीर आणि त्याचे वडील यांच्यामध्ये झालाय. या बाप लेकाने या करारावर सह्या केल्या आहेत. मजेशीर म्हणजे करारामध्ये ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या पाळल्यास कबिरला चक्क बक्षीस मिळणार आहे. 


करारानुसार रडणे, ओरडणे, बडबड करणे किंवा भांडणे न करता कामे पूर्ण करणे या बदल्यात अबीरला दररोज 10 रुपये मिळतील. याशिवाय, जर अबीर संपूर्ण आठवडा चांगला वागला तर त्याला बोनस म्हणून 100 रुपये मिळतील.


या अटींमध्ये अबीर याने अलार्म वाजल्यानंतर 10 मिनिटांसाठी जागे होण्याची वेळ मागितली. सकाळी 9 ते दुपारी 2 या शाळेच्या वेळेत दुपारच्या जेवणाची वेळ समाविष्ट आहे. न्याहारी, दुपारचे जेवण, दूध आणि रात्रीचे जेवण फक्त टीव्हीसोबत आहे. त्यामुळे 10 मिनिटांची उठण्याची वेळ वाढवावी अशी मागणी अबीर याने केली.


 



या सगळ्या अटी पिता-पुत्रांना मान्य झाल्यानंतर त्यावर दोघांच्या सह्या झाल्या. सहा वर्षाच्या मुलासोबत वडिलांचा करार हे ऐकून थोड वेगळ वाटलं असेल. पण Batla_G या Twitter होल्डरने ही पोस्ट करताच नेटकऱ्यांच्या कमेंट्स येऊ लागल्या. 


यातील एका नेटकऱ्याने आतापर्यंत अबीर याने किती रुपये कमावले असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी 2000 रुपये असे उत्तर दिलं शिवाय शाळा सुरु झाल्यापासुन टामटेबलमध्ये बदल करण्यात आला आहे असेही स्पष्ट केलंय. आधुनिक काळात, नवीन पालक पालकत्वाच्या विविध पद्धती वापरत आहेत. त्यामधीलच ही एक म्हणावी लागेल. तुम्ही पालक असाल तर हा करार करुन पाहु शकता.