मुंबई :शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्याला घेराव घालून दगडफेक आणि चप्पलफेक करणाऱ्या संपकरी आंदोलक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केलीय. या सर्वांवर दंगल परिस्थिती निर्माण करणे आणि षडयंत्र रचणे अशी विविध कलम लावण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिल्वर ओकवर हे आंदोलक अचानक थडकले आणि पोलिसांची एकच तारांबळ उडाली. किती तरी वेळ चालू असलेला हा धुमाकूळ अखेर सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आटोक्यात आणला.


या सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आतापर्यत 107 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यात 23 महिला आरोपी आहेत. येलो गेट पोलीस ठाण्यात आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जात असून या सर्व आंदोलकांना जवळच्या सेंट जॉर्ज या रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे


या सर्वावर गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दंगल परिस्थिती निर्माण करणे आणि षडयंत्र रचणे अशी विविध कलम लावण्यात आली आहेत.