Latest Update : मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या सकाळी, संध्याकाळी किंबहुना संपूर्ण दिवसभर धुसर वातावरण पाहायला मिळतं. हिवाळ्याचे दिवस सुरु झाले असल्यामुळं हे धुकं असावं असाच अनेकांचाच समज झाला. पण, तसं नाहीये. कारण हे धुकं नसून हे आहे धुकं आणि धुळीचं मिश्रण म्हणजेच धुरकं. सोप्या भाषेत सांगावं तर, राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या बऱ्याच शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. काही ठिकाणी तर हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच एक्यूआय दोनशेपर्यंतही पोहोचला. परिस्थिती इतक्या वाईट वळणावर असतानाच आता राज्याच्या आरोग्य विभागानेही सतर्क होत काही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला असणारा धोका लक्षात घेता हा धोका टाळण्यासाठी यंत्रणांनी काही उपाययोजना करण्यास सुरुवात केली.


हवेची पातळी इतकी का खालावली? 


हिवाळ्यात वातावरणात असणारे प्रदूषित वायू आणि धुलिकण हे हवेतच तरंगत राहिल्याने हवेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे मानवी आरोग्यावर याचा घातक परिणाम होतो. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या महिन्यात राज्यात विविध शहरांची हवेची गुणवत्ता खराब झाल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. 


हेसुद्धा वाचा : Weather Update : कोकणात बरसणार पाऊसधारा, राज्याच्या 'या' भागात मात्र हुडहूडी 


प्रदूषणाची एकूण पातळी पाहता सर्व जिल्ह्यांसह महापालिकांच्या प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील आरोग्य विभागाच्या सहसंचालकांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 


याच धर्तीवर सध्याच्या घडीला राज्यातील जवळपास 17 शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळं उदभवणाऱ्या तीव्र आजारांचं निरीक्षणही करण्यात येणार आहे. जिथं श्वसनासंबंधी समस्या असणाऱ्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शिवाय हवेती एक्यूआय पातळी ओळखून सर्वाधिक प्रभावी क्षेत्रांमध्ये तातडीनंउपाययोजना राबवण्यात येणार आहे.