मुंबई एअरपोर्टवरील हवाई वाहतूक सुरू
मंगळवारी संध्याकाळपासून जवळपास ठप्प असलेली वाहतूक मुंबई एअरपोर्टवरील हवाई वाहतूक सुरू झाली आहे. परंतु १५-२० मिनिटे उशिरा वाहतूक सुरू आहे. पाऊस, वारा आणि ढगाळ वातावरणामुळं हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे.
मुंबई : मंगळवारी संध्याकाळपासून जवळपास ठप्प असलेली वाहतूक मुंबई एअरपोर्टवरील हवाई वाहतूक सुरू झाली आहे. परंतु १५-२० मिनिटे उशिरा वाहतूक सुरू आहे. पाऊस, वारा आणि ढगाळ वातावरणामुळं हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे.
मुख्य रनवे अजून सुरू झालेला नाही. सेकंडरी रनवेवरून वाहतूक सुरू आहे. स्पाईस जेटचे काल चिखलात रूतलेले विमान काढण्याचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसला होता. नागपूरहून मंगळवारी रात्री निघालेली दोन ते तीन विमाने मुंबई विमानतळावर न उतरताच परत नागपुरात आली. मुंबई विमानतळाच्या रनवेवर पाणी साचल्याने आणि व्हिजिबिलिटी कमी असल्याने विमानांना लँडिंग करता आले नाही. नागपूर विमानतळावर माघारी आलेल्या विमानाच्या प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नागपूर विमानतळावर या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.