Ajit Pawar : `आज एका गोष्टीची खंत वाटतेय...` अजित पवार असं काय म्हणाले?
Ajit Pawar on Women`s Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. महिला दिन साजरा होत असताना महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही, असे ते म्हणाले.
Ajit Pawar on Women's Day : राज्याच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नाही. (Ajit Pawar on no place for women in the Maharashtra cabinet) आज देशासह जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान का दिलेले नाही. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही, असे ते म्हणाले.
पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला, राज्य सरकारला नुकसानीचा अंदाजच नाही - अजित पवार
अजित पवार यांनी महिला मंत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. एका गोष्टीची खंत वाटते की एवढा मोठे आपले राज्य आहे. पण तिथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रीमंडळात एकही महिला नसणं हे कमीपणाचं वाटते. राज्य सरकारला ते शोभत नाही. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही, असे अजितदादा म्हणाले.
दरम्यान, आज एकाच मंत्र्याकडे अनेक खाती आहेत. असे असताना मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा चर्चेत होता. तसेच, मंत्रिमंडळामध्ये महिला मंत्र्यांना स्थान मिळावे, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. मात्र, याचाही विचार या सरकारकडून झालेला नाही. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. मंत्रिमंडळात महिला नाही, ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गालाही योग्य वाटत नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?
राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. ( Farmers Loss ) त्यामुळे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलीय. आंबा, हरभरा, गहू मका द्राक्ष, कांदा यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारले? परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याच शेतकऱ्यांनी सांगितले आहे, असे ते यावेळ म्हणाले.