भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात सर्व ६ पोलिसांना अटक
भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात सर्व ६ पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यात जेल अधिक्षक मनिषा पोखरकर यांचाही समावेश आहे.
मुंबई : भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात सर्व ६ पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यात जेल अधिक्षक मनिषा पोखरकर यांचाही समावेश आहे.
मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने भायखळा तुरुंग अधिक्षक मनिषा पोखरकरसह बिंदू नाईकडे या महिला पोलिसालाही अटक करण्यात आली आहे. बिंदू नाईकडे हिला न्यायालयाने ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
२३ जून रोजी मंजुळा शेट्ये हिला तुरुंगात मारहाण करण्यात आली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. महिला कैद्यांना दिल्या जाणाऱ्या आहारातल्या अंडी आणि पावाबाबत मंजुळा शेट्येने तुरुंग अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता. त्याचा राग येऊन तिला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर भायखळा तुरुंगातल्या महिला कैद्यांचा उद्रेक झाला होता. या प्रकरणी जेल अधीक्षक मनिषा पोखरकर यांच्यासह ६ तुरुंग कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये प्रकरणात आमदार रमेश कदमही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झाले आहेत. इंद्राणीने केलेल्या आरोपांचा रमेश कदमकडूनही पुनरूच्चार करण्यात आलाय. रमेश कदमने सत्र न्यायालयात या संदर्भातील साक्ष देण्याकरिता विनंती अर्ज दाखल केलाय.