शेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव
शेतक-यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेच्या वतीने शेतक-यांचा भव्य लाँग मार्च काढण्यात आलाय.
मुंबई : शेतक-यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेच्या वतीने शेतक-यांचा भव्य लाँग मार्च काढण्यात आलाय.
राज्यभरातील शेतकरी या लाँग मार्चमध्ये सामील झालेत. नाशिक येथून मुंबई विधानसभेपर्यंत हे शेतकरी पायी निघालेत. हा लाँग मार्च १२ तारखेला मुंबईत पोहोचेल. त्यानंतर शेतकरी विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत.