कोणत्या पदांसाठी करु शकाल अर्ज :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे हंगामी स्वरुपाच्या विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 'वृत्तनिवेदक-तथा भाषांतरकार' (Reporter-and-translator), 'वार्ताहर' , 'वृत्तसंपादक -तथा- वार्ताहर' (News Editor -and- Correspondent), 'प्रसारण सहाय्यक' (Broadcast Assistant), आणि 'वेब सहाय्यक' (Web Assistant) या पदांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येतील. 


आकाशवाणीत संधी असलेल्या पदांचे स्वरुप
'हंगामी' स्वरुपातील या पदांसाठी पत्रकारितेचं ज्ञान (Knowledge of journalism), महाराष्ट्राची भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय माहिती असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. पत्रकारिता क्षेत्रात काम केलेल्या उमेदवारांना यात प्राधान्य दिलं जाणार असलं तरी 'वृत्तनिवेदक - तथा- भाषांतरकार' (Reporter-and-translator) पदासाठी पत्रकारितेचा अनुभव किंवा पदवी असणे आवश्यक नाही. आवाज, उच्चार उत्तम असणाऱ्यांना यासाठी प्राधान्य दिलं जाईल. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना आकाशवाणीच्या मुंबई  (Akashvani Mumbai) केंद्रावरुन प्रसारित होणारी बातमीपत्र वाचण्याची संधी मिळेल. 


'वृत्तसंपादक-तथा-वार्ताहर' (News Editor -and- Correspondent) पदावर निवड झालेल्या उमेदवारांना आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या संपादन प्रक्रियेत सहभागी होता येईल. वार्ताहर पदावर काम करणाऱ्या उमेदवारांना इंग्रजी आणि हिंदी भाषेत बातमी लिहावी लागेल. राष्ट्रीय पातळीवर दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या आकाशवाणीच्या बातमीपत्रासाठी त्यांना बातम्या पाठवाव्या लागतील. काहीवेळा आकाशवाणीच्या (Akashvani) देशभरातील श्रोत्यांपर्यंत ही बातमी आपल्या आवाजात पोहोचविण्याची संधीही यांना मिळेल. 


'वेब सहाय्यक' (Web Assistant) पदावर काम करण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेबसाइट (Website) आणि विविध समाज माध्यमांवर (Social Media) बातम्या अपलोड करण्याचा अनुभव मिळेल. याशिवाय यु-ट्युब, पॉडकास्ट यासारख्या माध्यमांवरही काम करण्याचा अनुभव मिळेल. 


अर्ज भरण्याची प्रक्रिया
या सर्व पदांसाठी लेखी परीक्षा, मुलाखत या माध्यमातून निवड प्रक्रिया राबवली जाईल. सविस्तर जाहिरात, अर्जाचा नमुना, नियम आणि अधिक माहिती https://prasarbharati.gov.in/wp-content/uploads/2022/09/Advertisement-Website-Notice-Format-Final.pdf या लिंकवर पाहता येईल. 
प्रवेश शुल्कासह पूर्ण भरलेला अर्ज - सहसंचालक, प्रादेशिक वृत्त विभाग, ५ वा मजला, नवीन प्रसारण भवन, मंत्रालयाच्या पाठीमागे, आकाशवाणी, मुंबई-४०००२०. या पत्त्यावर २० सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठवावा.