मुंबई : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. सह्याद्री आतिथीगृहावर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. तर, राज्यातील इतर महत्त्वाची शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ही प्रमाणपत्रे देण्यात आली. राज्याची राजधानी मुंबई येथे शेतकरी कर्ज माफी संबंधी मुख्य कार्यक्रम पार पडला. तर, उपराजधानी नागपुरात देखील येथील शेतकऱ्यांकसाठी कर्जमाफी संबंधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दिवाळीच्या तोंडावर या कार्यक्रमाचे आयोजन झाल्याने शेतकरी सुखावला असला तरीही राज्य सरकारकडून आपल्या आणखी काही अपेक्षा असल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.


रत्नागिरी जिल्ह्यात आज जिल्हाधिकारी पी प्रदीप, आमदार उदय सामंत, तसेच जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. रत्नागिरीच्या अल्पबचत सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात रत्नागिरीतील २५ शेतकऱयांना कर्जमाफी झाल्याची प्रमाणपत्र देण्यात आली. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६१ हजार ४४१ शेतकऱयांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरले असून अंदाजे १४५ कोटींची कर्जमाफी अपेक्षित आहे...