अंबरनाथ ग्रामपंचायत निवडणूकीत 4 जागांवर मनसेचा झेंडा
राज्यातल्या 12,711 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्यावर आज मतमोजणी होत आहे.
मुंबई : राज्यातल्या 12,711 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्यावर आज मतमोजणी होत आहे. आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचं भवितव्य निश्चित होईल. राज्यात 14234 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता पण काही ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली तर काही ठिकाणी मतदान होऊ शकलं नाही. त्यामुळे शुक्रवारी 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. तर आता हळूहळू ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती लागत आहेत.
उमेदवारांसह मतदारदेखील निकालाच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत मनसेने बाजी मारत भाजप आणि शिवसेना युतीचा पराभव केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने 4 पॅनेनवर विजय मिळवल्यानंतर मनसे वॉत्तांत अधिकृतद्वारे फेसबुकच्या माध्यमातून माहिती दिली आहे. 'घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतील 07 पैकी 04 सदस्य विजयी...' अशी पोस्ट करण्यात आली आहे.
अंबरनाथमधील 4 जागांवर मनसेनेचे नरेश गायकर, रेश्मा गायकर, सुरेखा गायकर आणि जयश्री गायकर यांचा विजय झाला आहे.